Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»राज्य»किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
राज्य

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

मुंबई-( प्रतिनिधी) – मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

• आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

• विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत

June 7, 2026

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

June 7, 2026

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

© 2026 ThemeSphere. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.