दि. ३० :राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026′ जाहीर केली आहे. या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबविली जात आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले व ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केलेलल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे,…
Author: तापी दर्पण
मुंबई, दि. २८ : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक १ जुलै २०२६ रोजी डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सन २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून कृषी, कृषि संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार व कृषी विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची…
जळगाव, दि. ३१ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा व धार्डी या गावांमधील नुकसानग्रस्त…
मुंबई, दि. ९ : राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू केली आहे. या एकात्मिक डिजिटल व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवांसाठी एकाच व्यासपीठावर सुविधा उपलब्ध झाली असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालाबाबत तसेच उपकेंद्र स्थापन करणेबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव…
नवी दिल्ली, दि. ९: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे. भारतात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आणि 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता दिली जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, पुरस्काराचा प्रवर्ग, अलीकडील छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या…
मुंबई-(प्रतिनिधी )-पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील महत्त्वाचे साधन असले तरी भविष्य केवळ एआयवर अवलंबून नसून त्याच्या वापराला दिशा देणारी मानवी बुद्धिमत्ता, विवेक, सद्सद्विवेकबुद्धी आणि मूल्ये यावरच ते अवलंबून आहे. पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास, सकाळ मीडिया समूहाचे समूह संपादक निलेश खरे, वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक, मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मराठी पत्रकार संघाचे राज्य…
मुंबई-(प्रतिनिधी)-आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटीबद्ध आहे. हा उपक्रम शासन, अध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एक लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्मल वारी आणि हरित वारी उपक्रमाच्या आढावा बैठकीत दिले. बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी पंढरपूर संस्थानचे विश्वस्त तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी केलेल्या विनंतीची प्राधान्याने दखल घेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उपक्रमाचे मार्गदर्शक शिवाजी महाराज मोरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.…
जळगाव-(जिमाका) —: शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रावेर- (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, गोरगाव व चिनावल परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक जोरदार वादळासह पावसाने धुमाकूळ घातला. ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून केळी, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही नुकसान झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.