Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»राज्य»राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद
राज्य

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 7, 2026No Comments4 Mins Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

मुंबई, दि. ६ : पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून २०२६ अखेर एकूण २२६ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच उल्लंघन आढळलेल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधी वनस्पती पासून प्राप्त होणारे विषारी द्रव्यांचा उपयोग औषधांचे उत्पादनात होत असल्याने व सदर विषारी द्रव्ये महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) च्या अनुसूचिमध्ये समाविष्ठ असल्याने सदर नियमाखाली परवाने मंजुरी प्राधिकार १९७७ मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले आहेत. संबधित कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (औषधे) परवाने मंजुरी प्राधिकारी आहेत.

राज्यातील सर्व घाऊक / किरकोळ मेथॉनोल परवाने धारकांनी, विषारी द्रव्ये, १९१९ व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ अंतर्गत नियम व परवान्याच्या अटींचे तंतोतत पालन करावे. नियमांचे उल्लघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल विषारी द्रव्ये अधिनियम व भारतीय न्याय संहिता, २०२३ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. औषधांच्या बाबतील बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्ती आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी म्हटले आहे.

विषारी द्रव्ये म्हणून मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव

महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) मधील अनुसुचिमध्ये नमुद विषारी द्रव्याचा वापर औषधांत करणे बंद झाले. त्यानुसार कोणतेही औषधाचे उत्पादक, घाउक किंवा किरकोळ औषधी विक्रेत्यांकडे या द्रव्याची उत्पादन, विक्री किंवा वितरणाकरीता साठवणूक करण्यात येत नाही किंवा परवाना घेतला जात नाही. त्यामुळे सन १९९२ मध्ये सर्व विषारी द्रव्ये १९७२ अनुसुचीमधून काढून टाकण्यांत आली व केवळ ७ विषद्रव्ये कायम ठेवण्यात आले.

मिथेनॉल चा विषारी द्रव्ये म्हणून अनुक्रमांक 7A. मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव दि. २१ जानेवारी २०११ मध्ये करण्यात आला. महाराष्ट्र विषारी द्रव्ये (दुरुस्ती)नियम, 2011 (Maharashtra Poison (Amendment) Rule 2011) च्या नियम १८A२ च्या नियमान्वये दुरुपयोग टाळण्यासाठी मिथेनॉल ची विक्री करण्यापूर्वी त्यात Methylene Carmine व Denatonium Saccharide चे मिश्रण करणे अनिवार्य केले होते. मात्र औषधी उत्पादन करण्यासाठी मिथेनॉल च्या विक्रीसाठी ही बाब लागू नव्हती.

या तरतुदीस मुंबई उच्च न्यायालय यांनी याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ द्वारे सदर दोन्ही याचिका २०१९ मध्ये निकाली काढल्या असून याचिका कर्त्यांची विनंती रद्द करण्यात आलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.८९३/२०१९ दाखल केले असून उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला स्टे याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ मध्ये पुढे कायम ठेवण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उक्त विशेष अनुमती याचिके अनुषंगे महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिज्ञापत्र माहे नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल केले असून सन २०११ मध्ये निर्गमित मिथेनॉल या विषारी द्रव्याची विक्री करताना त्यात Colorant व Bitterant टाकण्याबाबतची अधिसूचना कायम ठेवण्याबाबत सादर केलेले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ९३७ मेथानाँल विक्री परवाने धारकांच्या तपासण्या करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रातील परवाने धारक आस्थापनेला भेट देऊन विषारी द्रव्यांचे व्यवस्थापण, साठा, वितरण, विक्री इ तपासणी करण्याचे अधिकार आहेत. तपासणीत आढळून येणाऱ्या निरीक्षणानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विषारी द्रव्याचे आयात, साठवणूक व विक्री या वरील नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या विषारी द्रव्य अधिनियम, १९१९ कायद्यातील तरतुदीनुसार व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ कायदयाअंतर्गत प्राधिकार व अंमलबजावणीचे अधिकार गृह विभागाकडे देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पोलीस आयुक्त पद नसेल तेथे जिल्हा दंडाधिकारी यांना परवाने प्राधिकार देण्यात आले आहेत.

रेक्स इंटरनॅशनल कंपनीचा मिथेनॉल परवाना रद्द; ३ लाख ६० हजार किमतीचा संशयित मिथेनॉल साठा जप्त, गाळा सील

पुणे विषारी दारू प्रकरणात मिथेनॉलचा पुरवठा करण्यात सहभागी असलेल्या रेक्स इंटरनॅशनल भिवंडी या संस्थेविरुद्ध आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी धडक कारवाही केली असून ५ हजार २२९ किलो संशयित मिथेनॉल या विषारी द्रव्याचा ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा साठा नमुने चाचणीसाठी घेऊन जप्त केला आहे व गाळा सील करण्यात आला आहे.

परवाने रद्द करण्यास नोटीस बजाविण्यात आली असून मालक श्री अरुण कुमार चौबे व अभिषेख चौबे यांचे विरुद्ध नारपोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र.५२१/२०१६ दाखल करण्यात झाला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 7, 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत

June 7, 2026

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

© 2026 ThemeSphere. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.