Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»राजकारण»बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार;मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा
राजकारण

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार;मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

मुंबई, दि. ५ : बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यास सांगितले. तसेच आगामी काळात वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षांची आवश्यक ती छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशाही सूचना दिल्या.

शहरातील तसेच तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत तहसीलदारांनाही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 7, 2026

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 7, 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

© 2026 ThemeSphere. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.