Author: तापी दर्पण

शेतीसाठी पाणी व्यवस्थापनावर तज्ञांनी केले मार्गदर्शन जळगाव, दि. ६ : केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय व तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे ‘समृद्धी की पाठशाला’ या उपक्रमांतर्गत वाघूर डावा कालवा असोदा-भादली शिवार परिसरातील शेतकऱ्यांसाठी,एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या एमसीएडी समृद्धी योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमास केंद्रीय जलसंधारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अशोक जेएफ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, पाणी बचत व…

Read More

जळगाव, दि. ६ (जिमाका) : येत्या खरीप हंगामात ‘अल नीनो’च्या संभाव्य प्रभावामुळे हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य नियोजन करावे तसेच बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीसाठी ‘ब्रॉड बेड फरो (बीबीएफ)’ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, ‘आत्मा’ जळगाव व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म येथे आयोजित ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम तसेच ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब, खतांचा संतुलित वापर आणि मातीच्या आरोग्याकडे विशेष…

Read More