सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (जिमाका) :- शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुकरता आणणे आणि त्यांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची…
Author: तापी दर्पण
गडचिरोली, (जिमाका) दि. 06 : शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत शंभर टक्के पोहोचविण्यासाठी प्रशासनाने केवळ नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा न राहता विकासाभिमुख दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. वन विभाग, पोलीस प्रशासन तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी ‘रेग्युलेटरी माइंडसेट’ सोडून ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना केले. ‘विशेष सर्वेक्षण व सेवा समृद्धी मोहिमे’अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गुरनोली ग्रामपंचायतीला मुख्य सचिवांनी भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी शेती, सिंचन, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, घरकुल, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या व मागण्या मांडल्या. यावेळी विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे, पोलीस…
नवी मुंबई,दि.६: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय…
मुंबई, दि. ५ : बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण…
मुंबई, दि 6 : टाईमलाईन हे पुस्तक समाजमाध्यमावरील पोस्टसचे संकलन आहे. मात्र यामध्ये नकारात्मक विचार शोधूनही आढळणार नाही. टाईमलाईन हे समाजमनात सकारात्मकता पेरणारे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. रविंद्र नाट्यमंदिर येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अमित मायदेव, सुलेखनकार अच्युत पालव व विजय दर्डा हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ श्री राजेंद्र दर्डा…
मुंबई, दि. 6 : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमांतर्गत MSME हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे राज्यभरातील उद्योजकांना पूर्णतः मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME), भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम महाराष्ट्रात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मार्फत कार्यान्वित करण्यात आला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (MCCIA) यांच्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यातील…
मुंबई, दि. ६ : व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज आणि शिष्टमंडळ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सायं ४.०० वाजता प्रयाण झाले. यावेळी सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ राजेश गवांदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुंबई, दि. ६ : भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियमांचा भंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)तपास पथकाने मे.साची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया (Malaysia) येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले…
पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई मुंबई, दि. ६ : पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून २०२६ अखेर एकूण २२६ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच उल्लंघन आढळलेल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधी वनस्पती पासून प्राप्त होणारे विषारी द्रव्यांचा उपयोग औषधांचे उत्पादनात होत असल्याने व सदर विषारी द्रव्ये महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons…
पुणे, दि. ६ : तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्त्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते आदी भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठे, उद्योग आणि नवोद्योजकांना साथ, प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (एचईएफ) पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरतर्फे आयोजित ‘शक्ती समिट-२०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडाचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (निवृत्त), क्विंटसेन्स फ्रॅग्रान्सेस प्रा. लि.चे अध्यक्ष भरत कामटे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक…