Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»जळगाव»आदर्श आचारसंहिता भंगाबाबत तक्रारींसाठी जळगावात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित
जळगाव

आदर्श आचारसंहिता भंगाबाबत तक्रारींसाठी जळगावात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

जळगाव-(जिमाका ) : महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास अथवा त्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमची ३३ पथके तसेच फ्लाइंग स्क्वॉडची ३३ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत जिल्हाभर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी ०२५७-२२२०६०० या दूरध्वनी क्रमांकावर अथवा adcjalgaon@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

June 28, 2026

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

© 2026 Tapi Darpan. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us